विजय कार्यकर्त्यांना समर्पित… आमदार संजय गायकवाड
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरला झाली .या मतमोजणीअंती आलेल्या निकालावर उमेदवारांचा जय पराजय निश्चित झाला .. जिल्ह्यातील सात विधान सभेपैकी बुलडाणा विधानसभा निवडणुकाचा निकाल फेरी निहाय कमी अधिक होत असल्याने उमेदवार आणि कार्यकत्यामध्ये धडकी भरविणारा ठरत होता अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढाईत अखेर संजू भाऊ गायकवाड यांनी 841 मतांनी जयश्री शेळके यांचा पराभव केला
त्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साहला वाट मोकळी झाली संजु भाऊनी हा विजयाच श्रेय कार्यकर्त्यांना आणि लाडक्या बहिनीला देत मिळलेले मताधिक्य कमी असले तरी विजय हा विजय असतो अस सांगुण केंद्र आणि राज्यात महायुतीच सरकार आहे जर बुलडाणा विधानसभेत दुसरा उमेदवार निवडुन आला असता तर हा मतदार संध विकासापासून पुन्हा दुर गेला असता “जो जिता वही सिकंदर अस सांगत विजयांचे शिल्पकार कार्यकर्ते असल्याचा पुन्हउच्चार केला संजुभाऊच्या विजयी मिरवणुकीमध्ये तरुणांचा उत्साह मोठा होता त्यामुळे संजू भाऊंनी कार्यकर्त्यांना दिलेलं श्रेय हे विजयी मिरवणुकीमध्ये अधोरेखीत झाल …