केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांसमावेत बघितला “द साबरमती रिपोर्ट “
बुलडाणा ( प्रतिनिधी )विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आज केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांसमावेत “द साबरमती रिपोर्ट ” हा चित्रपट बघितला
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 20 नोव्हेंबरला सर्वत्र मतदानाची प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यभर प्रचार सभा घेतल्या निवडणुकीच्या व्यस्तते मधुन थोड वेळ मिळाल्यानंतर आज 21 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शिवसैनिकांसमावेत मेहकर येथील सिनेमार्क टॉकीज मध्ये “द साबरमती रिपोर्ट ” हा चित्रपट बघितला.. “द साबरमती रिपोर्ट “ह्या चित्रपटांमध्ये गुजरात येथील गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसमध्ये बसलेल्या राम भक्ताच्या धक्कादायक हत्याकांडाची वास्तव कथा या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आली आहे .गुजरातमधील गोद्रा हत्याकांडाविषयी अनेक भ्रमक गोष्टी समाजामध्ये पसरविल्या गेल्या आहेत त्या हत्याकांडाविषयीची वास्तवता लोकांना आणि शिवसैनिकांना समजली पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या शिवसैनिकांसमावेत आज हा चित्रपट बघितला गोध्रा हत्याकांडाचं वास्तव हे सर्वसामान्यांनाही सांगावं अस आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे मेहकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ संजय रायमुलकर मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव शिवछत्रपती मंडळाचे अध्यक्ष नंदू भाऊ मापारी माजी उपसभापती श्री तुपे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते …