ब्रेकिंग न्यूजसमाजीक वार्ता

सावधान ..बोथा घाटातून जपुन जावा… वाघोबा आहे जंगलात आता …

बुलढाणा येथील ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आला वाघ …पिकेटी7 सी पी-1 नावाचा 3 वर्ष वयाचा आहे वाघ.. बुलढाणा लगत असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अन्नसाखळी प्रमाणे पक्षी आणि प्राण्यांना पोषक वातावरण असल्याने या अभयारण्यात अनेक जाती प्रजातीचे हिस्त्र प्राणी वास्तव्यास आहेत, त्यात आता पुन्हा एका जंगलाच्या राज्याची भर पडली आहे.. पिकेटी 7 सी पी – 1 नावाचा 3 वर्ष वय असलेला म्हणजे अगदी तारुण्यात असलेला वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात वन विभागाच्या वतीने सोडण्यात आला आहे.. लांबचा प्रवास झाल्याने त्याला राखीव परिक्षेत्रात काही दिवस ठेवण्यात आले होते वातावरणाशी एकरूप झाल्यानंतर त्याला काल वन अधिवासात सोडले जाणार आहे.. पांढरकवडा व्याघ्र प्रकल्पामधून त्याला त्याला आणण्यात आले आहे त्याची आई मृत पावली आहे . यापूर्वी देखील सी – 1 नावाचा वाघ काही महिने ज्ञानगंगा आभारण्यात वास्तव्यास होता, मात्र तो काही महिन्यानंतर अचानकपणे बेपत्ता झाला होता.. आता हा नवीन वाघ अभयारण्यात दाखल झाल्याने वन्यजीव विभागाचे हे महत्त्वकांक्षी पाऊल मानले जात आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button