राज्य सरकारची कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथील घरासमोरच सुरू केले अन्नत्याग आंदोलन ..

बुलडाणा (प्रतिनिधी ) सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही फसवी असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली होती. आज,१५ जूनच्या सकाळपासून या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. बुलढाण्यातील चिखली रोडवरील निवासस्थानसमोरच रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी टप्प्याटप्याने बुलढाण्यात पोहचत आहे . यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारने जाहीर केलेली योजना कर्जमाफी योजना नसून “वन टाइम सेटलमेंट” योजना असल्याचा आरोप केला.
राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी असून त्यात असलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.



