राजकीय वार्तासमाजीक वार्ता

राजूर घाटात अज्ञाताने आणून टाकला वैधता संपलेला औषध साठा…

वन्यप्राण्यांसह मानवी आरोग्यास धोका, दोषींवर कारवाईची मागणी...

– बुलढाणा शहरालगत असलेल्या अजिंठा पर्वत रांगेतील राजुर घाटामध्ये निसर्गाचं मोठं सौंदर्य पाहायला मिळत, आणि अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा अनुभव घेत असतात, मात्र असे असताना याच ठिकाणी अज्ञात व्यक्तीने वैधता संपलेला औषध साठा आणून टाकल्याने निसर्गाचे सौंदर्य त्याचबरोबर वन्यप्राणी आणि मानवाच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.. यापूर्वी देखील आरटीओ कार्यालयाजवळ अज्ञात व्यक्तींनी असाच बायोवेस्टेज आणून टाकल्याची घटना घडली होती, पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button