आरोग्य वार्ताशासकीय वार्तासमाजीक वार्ता

बुलढाण्यात काढण्यात आली नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती रॅली*

“डोळे दान करा – दृष्टीची भेट द्या, आयुष्याला प्रकाश द्या” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागवतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुलढाण्यात नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .
जागतिक नेत्रदान दिन निमित्य 10 जून रोजी बुलढाणा शहरातील संगम चौकस्थित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारका समोरून या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या रॅलीचा समारोप गांधी भवन येथे झाला यावेळी नेत्रदान श्रेष्ठदान मृत्यू पश्चातही आपले डोळे हे जग पाहू शकतात तेव्हा प्रत्येकाने नेत्र दान करावे असा अहवाल यावेळी करण्यात आले नेत्रदानामुळे कॉर्नियल अंधत्व असलेल्या व्यक्तींना दृष्टी मिळण्याची संधी उपलब्ध होते. मृत्यूनंतर केलेले नेत्रदान अनेक अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करते हा संदेश या जनजागृती रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला या रॅलीमध्ये विविध महाविद्यालयाची विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button