क्राईमवार्ताब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय वार्ता

कट आउट पोस्टर लावण्यावरून बुलढाण्यात वाद… आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ? या प्रसिद्ध हिंदी गीताच्या काव्यावरून बुलढाण्यात कट आउट फोटो लावण्याचा हा वाद थेट बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हे झाले “हम तुम्हारे गलियो मे आकर रहेंगे ” हा तर संदेश देण्यात आला नाही ना ? अशी चर्चा सध्या बुलढाणा शहरामध्ये सुरू आहे …
बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शुभेच्छांचे पोस्टर लावण्यावरून मध्यरात्री वाद झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिखलीचे आमदार श्वेताताई महाले आणि विद्याधर महाले यांचे कट आउट पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे .
विद्याधर महाले मित्रमंडळाचे सदस्य तथा भाजपा शहराध्यक्ष मंदार बाहेकर हे प्रमोद गावंडे, मुन्ना बेडवाल, कौस्तुभ पाटील आणि मजुरांसह 29  ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता जयस्तंभ चौकातील गांधी भवनासमोर पोस्टर लावत होते. नगर परिषदेची परवानगी घेऊन हे काम सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याचवेळी एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायरमधून तीन ते चार जण उतरले. दुसऱ्या बाजूने विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबत आणखी तीन ते चार अनोळखी व्यक्ती तेथे आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. “तुम्ही पोस्टर कसे लावता?” असा जाब विचारत त्यांनी अश्लील शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि कार्यकर्ते व मजुरांना पोस्टर लावण्यापासून रोखल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन वाघमोडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button