खरिपाच्या पिकांसाठी प्रकल्पातील आरक्षित पाण्या व्यतिरिक्त शिल्लकचे पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासन तयार … केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली शेतकरी हिताची भूमिका …
शेतकरी हितासाठी जिल्हा प्रशासनाशी चार बैठका ...

बुलडाणा (प्रतिनिधी ) जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेले पाणी आणि भविष्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी आरक्षित करून ठेवलेल्या पाण्याव्यतिरिक्त जलशयात शिल्लक राहणाऱ्या पाण्यातून एक पाणी शेतकऱ्यांच्या तुर ,कपाशी ,हळद पिकांना देण्यास प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले आहे

अपुऱ्या पाऊसामुळे काही शेतातील पिके उभे वाळून गेलेत तर काही शेतातील पिके उत्पन्न खर्चही काढू शकले नाही खरीपातील तुर कपाशी आणि हळद या पिकांना एक पाणी दिल तर ही पिके काही प्रमाणात उत्पन्न देऊ शकतात ही अपेक्षा घेऊन जिल्ह्यातील अनेक शेतकरी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना भेटत होते .. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांच्यासमवेत अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्यात सध्या धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती घेतली भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासंदर्भात सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले . प्रकल्पात असलेले पाणी ,पिण्यासाठी लागणारे पाणी ,पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि या व्यतिरिक्तही दहा टक्के अतिरिक्त पाणी साठवून ठेवणे असे सारे सर्व सूक्ष्म नियोजन करून जर प्रकल्पामध्ये काही पाणी शिल्लक राहत असेल त्यातील पाणी आपण शेतकऱ्यांच्या शेतातील तूर कपाशी आणि हळद या पिकांना एक वेळेस तरी देऊ शकतो का याची चाचपणी अधिकाऱ्यांना करण्याचे निर्देशित केले

अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर या संदर्भातील सर्वे केला . सूक्ष्म नियोजन केले भविष्यात पिण्यासाठी लागणारे पाणी ..
पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि या व्यतिरिक्त दहा टक्के अतिरिक्त पाणी आरक्षित करून उर्वरित शिल्लक पाण्यातील काही पाणी तूर कपाशी आणि हळदीला देण्यास प्रशासन तयार झाले आहे त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने सकारात्मक भूमिका शेतकऱ्यांसाठी घेतली आहे प्रकल्पातील पाणी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या तुरीची कपाशी हळद आणि चाऱ्यासाठी सोडण्यात येणार आहे या पाण्याचा उपयोग काटकसरीने करावा रब्बीच्या पिकासाठी हे पाणी वापरू नये असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे



