क्राईमवार्ताब्रेकिंग न्यूजसमाजीक वार्ता

एसटी दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

धाड जवळ घडला अपघत

बुलढाणा तालुक्यातील धाड संभाजीनगर मार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात राज्य परिवहन महामंडळाच्या बस खाली आलेल्या दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून घटनेचे वृत्त कळताच झाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदत कार्य करून पुढील तपास सुरू केला आहे

प्राप्त माहितीनुसार मलकापूर आगाराची एमएच-06 बीडब्ल्यू-3638 क्रमांकाची एसटी बस करडी (धाड) येथील पुलावर आली असता, धाडकडून करडीच्या दिशेने जाणारी दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या बसवर जोरदार आदळली या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला व ती बसखाली अडकली.

या अपघातात ढालसावंगी (ता. बुलढाणा) येथील अंकुश पाडळे(वय 32), रवी चंदनशे (वय 23)
आणि कैलास शिंदे (वय 30) तिघेही राहणार ढालसावंगी हे तिघेही दुचाकी वरील स्वर गंभीररीत्या जखमी झाले असून बसच्या खाली दुचाकी आणि हे तिघेही अडकले होते झालेल्या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेऊन या तिघांनाही बसच्या खालून बाहेर काढले मात्र प्रचंड दुखापतीमुळे आणि झालेला रक्तस्राव तसेच डोक्याला झालेली गंभीर दुखापतीमुळे या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी अपघातात तिघे युवक हे धाड नजीक असलेल्या ढालसावंगी गावचे असल्याने ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button