बुलढाणा विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला ….! फायदा कुणाला होणार …!!
कुणाला बसणार धक्का !!!
बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक कमी मतदान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झाले आहे मतदानाचा घसरलेला टक्का कुणाला फायदेशीर तर कुणाला तोट्याचा ठरणार हे उद्या सकाळी सुरू होणाऱ्या मतमोजणी अंती येणाऱ्या निकालावर समजणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे
…बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबरला शांततेत मतदान झाले मतदानाची अंतिम टक्केवारी ही प्रशासनाने जाहीर केली आहे
त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे खामगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये 76.06 टकके त्यानंतर जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये 73.54% चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये 72.07% मलकापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 71.17% सिदखेडराजा मतदारसंघांमध्ये 17.22% मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये 68.97% आणि सर्वाधिक कमी म्हणजेच 62.39 टकके मतदान हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये झाले आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे महाविकास आघाडीच्या जयश्री शेळके यांच्यात सरळ लढत होत आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतदानाचा घसलेल्या टक्क्याचा फायदा आमदार संजय गायकवाड यांना होतो की जयश्री शेळके यांना होतो हे 23 नोव्हेंबरला येणाऱ्या मतमोजणीच्या निकालावरच समजणार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे लागले आहे ..