समाजीक वार्ता

विवेकानंद जन्मोत्सवानिमित्य  महाप्रसाद …. 50 एक्करावर बसलेल्या महापंगतीला 150 ट्रॅक्टर आणि 2000 स्वयंसेयकाच्या सहाय्याने वितरित करण्यात आला महाप्रसाद..*

वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी .. भक्तांची मागणी ...!

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे विवेकानंद जयंती  उत्सवाचा दरवर्षी पारंपारिक आणि धार्मिक कार्यक्रमाने  साजरा केला जातो. या जयंती महोत्सवाचे खास आकर्षक हे  महाप्रसाद असते  .. आज 250 क्विंटल पुरी  आणि 150 क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद एकाच वेळी 50 एकर शेतात बसलेल्या नागरिकांना 150 ट्रॅक्टरच्या सहाय्याने 2 हजार स्वंयसेवकांनी वाढण करून महापंगतीला भोजन वितरित करण्यात आल तत्पूर्वी…  स्वामी विवेकानंद यांच्या रथाने 50 एकरात बसलेल्या महापंक्तीच्या मधोमध भ्रमण केलं यावेळी नागरिकांनी या रथावर पुष्प उधळून स्वामीजींना अभिवादन केले त् यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी आमदार संजय रायमुलर उपस्थित होते  श्लोक म्हणून नंतर महापंगतीतील नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला …या महापंगतीत  महिला आणि पुरुषांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती  स्वामी विवेकानंद जयंती उत्सवानिमित्य  महाप्रसाद विरतरण  करण्याची   वर्षानुवर्षाची ही परंपरा आजही हिवरा आश्रम येथे जपल्या जात आहे या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला राज्यभरातून नागरिक आले होते  या सर्व नागरिकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला या महापंक्तीची नोंद गिनिश बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व्हावी अशी भक्तांची मागणी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button