आरोग्य वार्तादेशमहाराष्ट्र
हर-घर आयुर्वेदासाठी प्रकृती परिक्षण अभियानात आयुर्वेद उत्पादक कंपण्यांनी व संघटनांनी सहभागी व्हावे… केंद्रीय आषुय मंत्री प्रतापराव जाधव
-
बुलढाणा (प्रतिनीधी),
आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार देशामध्ये होण्याच्या दृष्टीकोनातून हर घर आयुर्वेद निसर्ग चाचणी (प्रकृती परिक्षण) अभियान देशात राबविल्या जात असून या अभियानात आयुर्वेद उत्पादक कंपन्यांनी आणि संघटनांनी सहभागी होऊन या अभियानाला गती द्यावी असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे - .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. आयुर्वेदीक अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी निसर्ग चाचणी (प्रकृति परीक्षण) अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियाना संदर्भातील बैठक आज दि. 22 नोव्हेबरला आरोग्य मंत्रालयात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा,भारतीय चिकीत्सा पध्दती राष्ट्रीय आयोगाच्या सभापती वैद्य जयंत देवपुजारी, देश का प्रकृतीक परीक्षण अभियानाच्या समितीचे सचिव डॉ. आशुतोष गुप्त उपस्थित होते - तर देशातील आयुर्वेदीक उत्पादक कंपनीचे संचालक तसेच आयुर्वेद संघटनेचे पदाधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
- सर्वसामान्य नागरीकांचा कल हा आयुर्वेदीक उपचार पध्दतीकडे वाढत आहे. या दृष्टीकोनातुन केंद्र सरकारच्या वतीने हर-घर आयुर्वेद उपक्रमाअंतर्गत निसर्ग चाचणी (प्रकृति परीक्षण) अभियान संपुर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये सहभागी होवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर आयुर्वेद ही संकल्पना पुर्णत्वात नेण्यासाठी सर्वांनी सहयोग देवून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. प्रतापराव जाधव यांनी यावेळी केले.