केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त मोफत रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन. मुंबईतील नामांकित डॉक्टर्स शिबीरार्थींची करणार तपासणी. ..
- केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त मेहकर येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन 25 नोव्हेंबरला करण्यात आले असुन या शिबीरात मुंबई येथील तज्ञ डाँक्टर्स उपस्थीत राहणार आहे.
मेहकर येथील राजश्री आयुर्वेदीक महाविद्यालय व रुग्णालय येथे. शिवसेना, महिला आघाडी, युवासेना पदाधीकारी व शिवसैनीकांच्यावतीने केंद्रीयमंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे भुमिपुत्र प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमीत्त 25 नोव्हेंबरला भव्य मोफत आरोग्य रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी 9 ते दुपारी 4 वाजे पर्यंत सुरु राहणार असुन मुंबई येथील जे.जे. हॉस्पीटल सह नामांकीत डॉक्टर्स या शिबीराला उपस्थीत राहुन शिबीरातील रुग्णांची आरोग्य तपासणी करणार आहेत. या शिबीरामध्ये अस्थीरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कान,नाक,घसा तज्ञ, मुत्रपींड व मुत्रमार्ग विकारतज्ञ, मेंदु व मज्जासंस्था विकार तज्ञ, जठर व पोटाचे विकार तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, कर्करोग तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, मानसीक आजार तज्ञ सहभागी होणार आहेत. या शिबीरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांना मोफत औषधी चष्मेंची वाटप व आयुष्यमान कार्ड मोफत काढुन मिळणार आहे . या शिबीरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बळिराम मापारी, महिला आघाडी प्रमुख मायाताई म्हस्के, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषीकेष जाधव, उप जिल्हाप्रमुख गाडेकर, तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळुकार, लोणार तालुका प्रमुख भगवानराव सुलताने,मेहकर शहर प्रमुख जयचंद बाठीया यांच्या वतीने करण्यात आले आहे.