केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी घेतला लाभ …मुंबई येथील नामांकित डॉक्टरांनी केली रुग्णांची तपासणी..
आरोग्य सेवा ही जनसेवा समजुन गोरगरीब जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याच्या दृष्टिकनातून मी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही केंद्रीय आयुष कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली …
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये आज 25 नोव्हेबरला मोफत रोग निदान , रक्तदान आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते
यावेळी व्यासपीठावर आरोग्य विभागाचे संचालक सोहम वायाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ कैलास झिने, जिल्हाशल्स चिकित्सक डॉ भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा बळीराम मापारी शांताराम दाणे ओमसिग राजपूत युवासेन जिल्हा प्रमुख ऋषी जाधव माजी आमदार तोताराम कायंदे महिला आघाडीच्या मायाताई म्हस्के आशाताई झोरे सुरेश तात्या वाळुकार भगवान सुलताने संजय अवताडे राजू बघे रामदास चौथनकर धनंजय बारोटे शरद पाटील विश्वास पाटील स्वप्निल घोगटे अजय पारस्कर डॉ सुनील कायंदे मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि राजश्रीताई जाधव यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला तर खामगाव शिवसेनेच्यावतीने केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला सत्काराला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा घडेल अशी लोक कल्याणकारी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे .सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावा या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री जनआरोग्य अभियानांतर्गत पाच लाख रुपयांचा उपचार करण्यात येत आहे शिवाय जेनेरिक औषधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडतील अशी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील जनता आरोग्य सुविधे पासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून बुलढाणा येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये भूमिपुत्र आरोग्य कक्षेचे स्थापना ही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आज घेतलेल्या आरोग्य मेळाव्यामध्ये मुंबई येथील नामांकित डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये रुग्ण तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार करण्यात आला तर गंभीर आजारी रुग्णांवर मुंबई येथे मोफत उपचार करण्यात येणार आहे या शिबिराचा लाभ अनेक गरजूंनी घेतला ….