आरोग्य वार्ताब्रेकिंग न्यूज

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुर्वेद निसर्ग चाचणीने प्रकृती परिक्षण अभियानाला देशात सुरुवात …! हे अभियान आयुर्वेद उपचारासाठी नवीन दालन उपलब्ध करून देणारे ठरेल केद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव ..!!

संविधान दिनापासून देशात आयुर्वेद निसर्ग चाचणीला सुरुवात

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुर्वेद निसर्ग चाचणीने देशात आजपासून प्रकृति परीक्षण अभियानाला सुरुवात झाली आहे या प्रसंगी केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते आयुर्वेद निसर्ग चाचणी अभियान पुढील एक महिना संपूर्ण देशात चालणार आहे .

आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार देशामध्ये होण्याच्या दृष्टीकोनातून हर घर आयुर्वेद निसर्ग चाचणी (प्रकृती परिक्षण) अभियान देशात राबविण्याचा संकल्प केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव हाती घेतला आहे भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून हर घर आयुर्वेद अंतर्गत आयुर्वेद निसर्ग चाचणी (प्रकृती परिक्षण) अभियानला 26 नोव्हेबर पासून संपूर्ण देशात राबविल्या जाणार आहे आहे या अभियानाची सुरुवात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या आयुर्वेद निसर्ग चाचणीने झाली यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते

हर घर आयुर्वेद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प या अभियानातून साकारल्या जाणार आहे हे अभियान 26 नोव्हेंबर पासून संपूर्ण देशात सुरू झाले आहेत पुढील एक महिना हे अभियान देशात राबविल्या जाणार असून अभियानाची सांगता 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती दिनी होणार आहे या अभियानामध्ये चार लाख पेक्षा जास्त आयुर्वेदचे शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टर्स सहभागी होणार आहेत या अभियानाच्या माध्यमातून एक महिन्यांमध्ये एक करोड नागरिकांची आयुर्वेद निसर्ग चाचणी (प्रकृती परिक्षण) करण्याची उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहेत . हे परीक्षण करताना आधुनिक तंत्रज्ञानाचाही उपयोग घेण्यात आला आहे या अभियानामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुर्वेद चाचणी अहवालानुसार मोबाईलवर आरोग्य संदर्भातील माहिती देण्यात येणार आहे देशातील हा अभिनव प्रयोग आयुर्वेद निसर्ग उपचारासाठी नवीन दालन उपलब्ध करून देणारा ठरणार आहे अशी अपेक्षा केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button