आमदार डॉ संजय रायमुलकर चौथ्यादा करणार नामांकन अर्ज दाखल …
मेहकर विधान सभा मतदारसंघातुन डॉ संजय रायमुलकर यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली असून ते आज चौथ्यांदा आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे . मेहकर मतदार संघात शिवसेनेतर्फे डॉ संजय रायमुलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे .2009 मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ राखीव प्रवर्गातून खुल्या प्रवर्गासाठी खुला झाला . तर मेहकर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला त्यामुळे मेहकरचे तत्कालीन आमदार व सध्याचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतराव लागण तर मेहकर विधानसभेसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख असलेले डॉ संजय रायमुलकर यांनी प्रथमच 2009 मध्ये विधानसभेची निवडणूक लढावी लागली . जनतेशी नाळ जुळून असलेले डॉ संजय रायमुलकर 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर 2014 ,2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सलग तीन वेळेस निवडून आले . आता चौथ्यांदा 2024 च्या विधानसभा निवडणुकीला ते सामोरे जात आहे आज 24 ऑक्टोबरला आपला नामांकन अर्ज ते दाखल करणार आहेत मेहकर येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून ते तहसील कार्यालय येथे जाऊन उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतर मेहकर येथील स्वतंत्र मैदान येथे जाहीर सभा होणार आहे या सभेला केंद्रीयमंत्री शिवसेना नेते प्रतापराव जाधव व डॉ संजय रायमुलकर मार्गदर्शन करणार आहेत …