महाराष्ट्र

रविकांत तुपकरांचा राजकीय प्रवास क्रांतीकारी होणार ? का संघटनात्मक …!

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी 22 ऑक्टोबरला राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अखेर क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली …क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सिम्बॉलचे ( चिन्ह ) लोकापर्ण झाले . शेतकरी संघटनेमध्ये फक्त क्रांतिकारी हा शब्द वाढला …. शेतकरी शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असावी म्हणून स्वर्गीय शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेचे स्थापना केली.शेतकरी संघटना असा नामोल्लेख असलेला बिल्ला हा शेतकऱ्यांच्या छातीवर लागला . शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे पाईक या संघटनेमध्ये सहभागी झाले . बघता बघता ही शेतकरी संघटना राज्यातील गाव खेड्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचली . याच संघटनेमध्ये अनेक नेतृत्व तयार झाले

. बुलढाणा जिल्ह्यातील सावळा या खेड्यात जन्मलेल्या रविकांत तुपकर यांनी वयाच्या 20 वर्षी हसनराव देशमुख नामदेवराव जाधव देविदास कणखर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे काम सुरू केलं शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन शेतकरी संघटनेच्या आंदोलनात रविकांत तुपकर यांचा सहभाग शेतकरी आणि त्यांच्या मुलांना स्पुर्ती देणारा ठरला . शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेतून राजू शेट्टी हे वेगळे झाले आणि त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली . त्यावेळी राजू शेट्टींच्या सोबत रविकांत तुपकर गेले . राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रस्थ वाढविले . ऊस , सोयाबीन , कापूस यांना हमीभाव आणि स्वामीनाथन आयोग यांच्या शिफारसी लागू करा हे मुद्दे घेऊन त्यांनी राज्यभरात विविध आंदोलने केलीत त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटना ही घराघरापर्यंत पोहचली . या आंदोलनातून शेतकऱ्यांच युवा नेतृत्व म्हणून रविकांत तुपकर संपूर्ण महाराष्ट्रभर नवा रुपाला आले …. शेतकरी नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये दरम्यानच्या काळात मनभेद झाले . पण स्वाभिमानी हेल्पलाइनच्या माध्यमातून तुकाराम शेतकऱ्यांचे काम सुरूच ठेवली . गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी नशिबी आजमावलं परंतु त्यांना यश आलं नाही . पण अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी घेतलेली अडीच लाखांची मते हे त्यांसाठी राजकीय नेतृत्व सिद्ध करणारी ठरली .. विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय भवितव्य अजमावण्यासाठी त्यांनी पुन्हा कंबर कसली . गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सिंदखेडराजा मतदारसंघात सर्वाधिक मते मिळाली ..75 हजार हि मते ही आमदार म्हणून निवडून येण्यासाठी पुरेशी ठरतात . पण गतकाळातील डॉ राजेंद्र शिंगणे व रविकांत तुपकर यांची दोस्ती पाहता तुपकरांनी आमदारकीसाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा केंद्रबिंदू केला . महाविकास आघाडी तर्फे रविकांत तुपकर उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहेत त्यांनी नुकत्याच उद्धव  ठाकरे शरद पवार यांच्या ही भेट घेतल्या . पण 22 ऑक्टोबर बुलढाणा येथे बैठक घेऊन रविकांत तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली ..महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना ही रविकांत तुपकरांच्या भविष्याची नांदी ठरणार आहे …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button