जिल्ह्यात एकही विधान सभेत नामनिर्देशनपत्र दाखल नाही
105 व्यक्तीनी 188 नामनिर्देशन अर्ज
बुलडाणा ( प्रतिनिधी ) विधानसभा निवडणूक-2024 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सात मतदारसंघात दि. 22 ऑक्टोंबर 2024 रोजी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. दरम्यान आज सात मतदारसंघात एकूण 105 व्यक्तींनी 188 नामनिर्देशन अर्जाचे उचल केले.
मतदारसंघ निहाय माहिती याप्रमाणे : 22-मलकापूर विधानसभा मतदारसंघात 18 व्यक्तीनी 41 अर्ज, 23-बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 13 व्यक्तीनी 22 अर्ज, 24-चिखली विधानसभा मतदारसंघात 26 व्यक्तीनी 46 अर्ज, 24-सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात 19 व्यक्तीनी 36 अर्ज, 25-मेहकर विधानसभा मतदारसंघात एकही अर्ज उचल नाही, 26-खामगांव विधानसभा मतदारसंघात 14 व्यक्तीनी 22 अर्ज व 27-जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात 15 व्यक्तीनी 21 अर्ज असे एकूण 105 व्यक्तींनी 188 अर्ज उचल केले आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि. 29 आक्टोंबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. सोमवार दि. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे