महाराष्ट्र
बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ॲड जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी जाहीर …
बुलढाण्यात राहणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना
बुलडाण – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून ॲड जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर जयश्री शेळके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीतील नेत्यांचे आभार व्यक्त केले येणाऱ्या विधानसभेमध्ये मतदार संघातील सिंचनाचा प्रश्न बेरोजगारी औद्योगिक विकास महिला सक्षमीकरण हे मुद्दे घेऊन जनतेच्या समोर जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे यापूर्वीच बुलढाणा विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे