महाराष्ट्रराजकीय वार्ता
आमदार आकाश फुंडकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच खामगाव येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष..! महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरला डीजेवर ताल…!!
बुलढाणा जिल्हयातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आकाश फुंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय.. खामगाव शहरातील भाजपा कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केलाय..
आकाश फुंडकर हे सलग तिसरी वेळ खामगाव मतदारसंघातून विजयी झाले आहेत, भाजपा कडून नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिल्याने खामगाव सह बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे..
दरम्यान महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हर्ष उल्हासात डीजेवर चांगलाच ताल धरल्याचं पाहायला मिळालं…