राजकीय वार्तासमाजीक वार्ता
सिंदखेड राजा येथे रास्ता रोको ..! ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्याच्या केला विरोध ..!!
ओबीसी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही त्यांना डावलण्यात आले ओबीसींसाठी रस्त्यावर लढणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळातून बाजूला केल्याबद्दल संतप्त झालेल्या ओबीसी तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथे रास्ता रोको आंदोलन करून आपला विरोध प्रकट केला
त्यामुळे नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी टप्प झाली होती परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला आहे यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात विरोध दर्शवित घोषणाबाजी केली