केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आसाम मधील मंगलदाई गावाला भेट देऊन शेतकरी , विद्यार्थी आणि ग्रामस्थांसोबत केली चर्चा ...! आकांशी विकास कामांना गती देण्याची केली सुचना ....!!
- बुलडाणा ( प्रतिनिधी ) आकांशी जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत 15 डिसेंबरला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आसाम राज्यातील मंगलदाई गावाला भेट देऊन तेथील शेतकरी शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांसोबत चर्चा करून विकास कामांची माहिती जाणून घेतली सोबतच विकास कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील 112 अविकसीत जिल्ह्याना विकसीत जिल्ह्यांच्या सोबत आणण्यांच्या दृष्टिकोनातून सन 2018 पासून केंद्र सरकारच्यावतीने आकांशी जिल्हा विकास कार्यक्रम (ADP) योजना देशात सुरू करण्यात आली आहे . केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे आसाम राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आज 15 डिसेबर रोजी आकांशी जिल्हयाच्या यादीत असलेल्या दरांग जिल्ह्यातील मंगलदाई गावाला भेट दिली गावातील प्राथमिक शाळा , गावला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची पाहणी केली त्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन शेती संदर्भात माहिती जाणून घेत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली
गावातील आयुष्यमान भारत मंदिरालाही भेट देऊन तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी हितगुजन करून आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा मानून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची सेवा करा अशा सूचनाही मंत्री महोदयांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्यात .
त्यांनतर आसाम येथील कैशल्य विश्व विद्यालयाची पाहणी केली आणि जिल्हयातील विभाग प्रमुखांसोबत बैठक घेवून केद्र सरकारच्या वतीने आकांशी जिल्हयासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा आढवा घेतला ..या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विकास कामांना गती देण्याच्या सुचना संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्यात . यावेळी आमदार बसंत दास आमदार परमानंद राजबोंशी आसाम राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते