महाराष्ट्र

धाड दंगल प्रकरणातील मुळाशी जाऊन दोर्षीवर कडक कारवाई करा … केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलीसांना केली सुचना

बुलढाणा ( प्रतिनिधी )धाड येथील दंगल प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कडक कारवाई करा अश्या सूचना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पोलीस विभागाला दिल्या आहेत

बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे 30 नोव्हेबरला टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती ही रॅली धाड येथील स्टेट बँक चौकात आल्यानंतर किरकोळ वाद झाला होता हा वाद गावातील लोकांनी मिटवल्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडण्यात आले त्यानंतर दोन गटांमध्ये वाद विवाद होऊन दगडफेक झाली त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत धाडमध्ये जमाबंदी लागू केली आज 1 डिसेंबरच्या सायंकाळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी धाड येथे जावुन घटनेची माहिती घेतली यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील ठाणेदार नरेंद्र पेदोर उपस्थित होते त्यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलिसांना सूचना केल्या की जिल्ह्यात वारंवार दंगलीचे प्रकार घडत आहे तेव्हा घटनेच्या मुळाशी जाऊन घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करा कारवाई करत असताना निर्दोष नागरिकांना यामध्ये गोवु नका अशा सूचना केल्यात शिवाय धाड परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज चेक करून घटनेची माहिती जाणून घ्या व गावात अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करा अशी सूचना ही त्यांनी यावेळी दिल्यात गावामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर सहकार्य करून एकोप्याचे वातावरण निर्माण करावं असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिग राजपूत निलेश गुजर श्री खडके यांच्या सह गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते …

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button