जिल्हा कारागृहात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम संपन्न
बुलढाणा,: कारागृहातील बंद्यांसाठी जिल्हा कारागृह वर्ग-2 येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक संदिप पा. भुतेकर तर जिल्हा क्षयरोग अधिकरी डॉ. वर्षा गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात डॉ. वर्षा गुट्टे यांनी बंद्यांसाठी क्षयरोगाबाबत मार्गदर्शन केले तर करुणा घोडेस्वर यांनी बंद्यांना एड्स या रोगाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बंद्यांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वयक डॉ. सिध्देश्वर सोळंकी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक राजेंद्र सुरडकर, जिल्हा समन्वयक अनिल सोळंके, आरोग्य सहाय्यक राजेंद्र सरोदे, मेघा बाहेकर तसेच वरिष्ठ तुरुंग अधिकारी व कारागृह कर्मचारी यांनी योगदान दिले.
000