माघार … कोण घेणार ….! बंड होणार का थंड ….!!
विधानसभेतील लढतीचे चित्र होणार आज स्पष्ट
बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 199 उमेदवारांनी उमेदवारांनी 288 नामांकन अर्ज दाखल केले होते छाननी दरम्यान 12 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अपात्र ठरले होते त्यामुळे 187 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते यातील कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार हे आज 4 नोव्हेंबरला निश्चित होणार आहे त्यानंतरच मतदार संघातील लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे उमेदवारी मागे घेण्याची तारीख संपल्यानंतर कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती उमेदवार निवडणूक लढणार आहे हेही स्पष्ट होणार आहे उमेदवाराचा मतदारसंघातील संपर्क आणि लोकमत कोणाच्या बाजूने उभ राहते यावरूनच राजकीय भविष्य ठरणार आहे त्यामुळे काही मतदारसंघात दुरंगी तर काही मतदारसंघात तिरंगी चौरंगी आणि पंचरंगी ही लढत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकते तर राजकीय पक्षाचे नेते अंतर्गत बंडखोरी थांबवण्यास यशस्वी ठरता का हे येणारा काळाच सांगणार आहे उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्याची शेवटची संधी ही चार नोव्हेंबर असल्याने सर्वांच्या नजरा माघारीकडे लागल्या आहेत …