दम असेल तर विजयराज शिंदे यांनी निवडणूक लढावीच … आमदार संजय गायकवाड यांचे आवाहन …..! तर आमदार संजय गायकवाड पेक्षा एकही मत कमी घेतलं तर यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही माजी आमदार विजयराज शिंदे यांचं प्रति आवाहन …!!
कुणाचे फटाके फुटणार दमदार ?
दम असेल तर विजयराज शिंदे यांनी निवडणूक लढावीच … आमदार संजय गायकवाड यांचे आवाहन …..! तर आमदार संजय गायकवाड पेक्षा एकही मत कमी घेतलं तर यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही माजी आमदार विजयराज शिंदे यांचं प्रति आवाहन …!!
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात राजकीय फटाके फुटत आहे. महायुतीचे उमेदवार आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांना दम असेल तर निवडणुकीत उभाच रहा..? अस प्रति आव्हान दिलाय … तर या आव्हानाला प्रत्युत्तर देताना माजी आमदार विजयराव शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींनी आदेश द्या … आमदार संजय गायकवाड पेक्षा एकही मत कमी घेतलं तर यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही अशी घोषणाच माध्यमांसमोर केली . त्यामुळे दिवाळीचे फटाके फुटल्यानंतर आता राजकीय फटाके ही फुटत आहे कुणाचे फटाके दमदार तर कुणाचा बार फुसका ठरणार हे येणाऱ्या काळातच मतदारांना दिसणार आहे.बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी दुसऱ्यांदा आपला नामांकन अर्ज दाखल केला . भाजपाचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी सुद्धा अपक्ष आपला नामांकन अर्ज दाखल केला त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . हे राजकीय बंड थंड करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी राजकीय खेळी खेळत चिखली विधानसभा मतदार संघात त्यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा नामांकन अर्ज दाखल केला आहे . या मतदारसंघात भाजपाच्या श्वेताताई महाले निवडणूक लढत असून त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहे त्यामुळे त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच कैचीत पकडून विजयराज शिंदेंना नामोहरण करण्याची राजकीय खेळी खेळली आहे . ..दरम्यान संजय गायकवाड यांनी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दम असेल तर निवडणुकीत उभे राहावं आणि निवडणूक लढावी असं आव्हान केल आहे .. तर गेल्या पाच वर्षात आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा नेत्याच्या विरोधात वेळोवेळी आक्षेपार्य विधाने केली आहेत या संदर्भातील सर्व क्लिप्स पक्षश्रेष्ठींना दाखवून या विधानसभा मतदारसंघात महायुतीची मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे या निवडणुकीमध्ये संजय गायकवाड यांच्या पेक्षा एकही मत जर कमी घेतलं तर मी आयुष्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही अशी घोषणा विजयराज शिंदे यांनी माध्यमांसमोर केली आहे मला पक्षश्रेष्टीने भेटायला बोलावले आहे चार नोव्हेंबरला कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे ही विजयराज शिंदे यांनी सांगितले …दिवाळी संपली … फटाके फुटले परंतु आता विधानसभेची निवडणूक सुरू झाली आहे त्यामुळे राजकीय फटाके ही फुटत आहे . कुणाचे फटाके दमदार फुटतात तर कुणाचा बार फुसका ठरतोय हे येणाऱ्या दिवसातच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनतेला दिसणार आहे