फरफटत जणार नाही … हे विधान तुपकरांच्या उमेदवारीसाठी घातक ठरल का ?…
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर इच्छुक होते . यासंदर्भात त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही केली . सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीबद्दल सकारात्मकता दर्शवली अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली… गाठीभेटी सुरू असताना आम्ही फरफटत जाणार नाही आम्ही स्वाभिमानाने उमेदवारी घेऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती . फरफटत जाणार नाही हे विधान रविकांत तुपकर यांच्या संभाव्य शिवसेना उमेदवारीला घातक ठरले तर नाही ना …? या विधानातून तुपरकरांना स्वभिमानी बाणा पक्ष प्रमुखांना दाखवायचा होता का ? … पण विधानाचा अर्थ पक्षप्रमुखांनी अति महत्वकांक्षी नेतृत्व असा तर घेतला नसेल ना ?… म्हणूनच की काय शिवसेना पक्षप्रमुखांसोबत रविकांत तुपकरांची चर्चा सुरू असतानाच ऐनवेळी जयश्री ताईंना उद्धव बाळासाहेब ठाकरें पक्षात प्रवेश दिला गेला आणि दुसऱ्या दिवशी उमेदवारी हि जाहिर झाली … कदाचित फरफटत जाणार नाही हा शब्द रविकांत तुपकरांच्या उमेदवारीला घातक ठरला तर नाही ना …? प्रश्न उपस्थित होत आहे .