स्वच्छ चरित्र संपन्न उमेदवारांना पाठिंबा देऊ …रविकांत तुपकर
पहिले सांगितलं हो ... नंतर सांगितलं नाही ... क्रांतिकारी शेतकरी संघटना करणार करेक्ट कार्यक्रम ...!
स्वच्छ चरित्र संपन्न उमेदवारांना पाठिंबा देऊ …रविकांत तुपकर
पहिले हो सांगितलं … नंतर नाही सांगितलं …
क्रांतिकारी शेतकरी संघटना करणार करेक्ट कार्यक्रम …..बुलडाणा =
चांगल्या विचाराचे .. चरित्र संपन्न आणि शेतकऱ्यांशी नाळ जुळवून ठेवणाऱ्या उमेदवारांना क्रांतिकारी शेतकरी संघटना पाठिंबा देणार असल्याची घोषणा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केली ज्यांनी ऐनवेळी दगा दिला त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे सांगत महाविकास आघाडी सोबत जाणार नसल्याचही केलं स्पष्ट ..
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क साधला दोन-तीन बैठका ही झाल्यात त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम हो सांगितलं परंतु ऐनवेळी नाही सांगितलं आता आम्ही शेतकऱ्याची ताकद त्यांना दाखवून देऊ त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असे सांगतानाच महाविकास आघाडी सोबत जाणार नसल्याचे ही रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले क्रांतिकारी शेतकरी संघटना ही सामाजिक संघटना आहे या संघटनेसोबत असणारे लोक अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहे त्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटना पाठिंबा देणार आहे अशी माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली …