महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत दाखल केला नामांकन अर्ज ..
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेणार महायुतीचं गतिशील सरकार पुन्हा राज्यात आणा ... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बुलडाणा :– हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार श्वेताताई महाले यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला चिखली येथील चौफुली येथून शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत ही रॅली राजा टॉवर येथे येऊन पोहोचली त्यानंतर राजा टॉवर येथे विजय संकल्प सभा पार पडली या सभेला भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांना 24 तास विज पुरवठा करणारी आणि अतिरिक्त विजेचे शेतकऱ्यांना पैसे देणारी शेतकरी सोलर प्लांट योजना भविष्यात राज्यात राबविणार आहे महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले . हे सरकार गतिशील सरकार आहे तर त्यापूर्वीच सरकार हे स्थितिशील सरकार होतं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारला लगावला . लाडकी बहीण योजना ही पुढेही सुरू राहणार आहे असे सांगतानाच एस टी मध्ये महिलांना 50 टक्के तिकीट प्रवास योजना सुरू केली या योजनेमुळे तोट्यात असलेली एसटी फायद्यात आली .
वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायमस्वरूपी निकाली निघणार असून पाचशे किलोमीटरची नवीन नदी तयार करण्याचं काम भविष्यात केल्या जाणार आहे चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही उर्वरित विकास कामे करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा श्वेताताई महाले यांना विजयी करा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं यावेळी महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत