क्रिडा वार्ताशैक्षणीक वार्तासमाजीक वार्ता
बुलडाण्यातील प्रथमेश जावकार होणार 18 एप्रीलला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

बुलढाणा येथील आंतराष्ट्रीय आर्चरी खेळाडू प्रथमेश समाधान जावकार यांच्या कामगीरीची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन 2023-24 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवछत्रपती क्रीडा क्रीडापीठ (बॅडमिंटन हॉल) म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व इतर सन्माननीय मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. पुरस्काराचे स्वरुप 3 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ प्रदान करुन मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथमेश समाधान जावकर यांना सन्मानीत करण्यात येणार आहे,