क्राईमवार्ताराजकीय वार्तासमाजीक वार्ता
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर मध्य प्रदेश एस टी बस व ट्रक मध्ये अपघात तीन जण ठार 20 जन जखमी*

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सहा वरील नांदुरा गावाजवळ ट्रक आणि मध्यप्रदेश परिवहन बसचा भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण ठार तर 18 जण जखमी झाले असून जखमींना खामगाव व अकोला येथील रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे 15 15 एप्रिलच्या सकाळी मध्यप्रदेश परिवहन मंडळाची एसटी बस खामगाव येथून प्रवासी घेऊन बरामपुर कडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग सहा वरील नांदुरा गावाजवळील आमसरी फाट्याजवळ वीट वाहतूक करणाऱ्या 407 ट्रक आणि बस यांच्यामध्ये अपघात झाला या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर बस मधील जवळपास 20 जण जखमीना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात तर गंभीर जखमीना अकोला येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडलाय