जयश्रीताईंवर उबाटा शिवसेना पक्षाची भूमिका मांडण्याची देण्यात आली जबाबदारी ….

जयश्री शेळले यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातुन शिवसेना उबाटा पक्षा तर्फे निवडणूक लढवली होती या निवडणुकी दरम्यान उद्धव ठाकरे यांची बुलढाणा येथे जाहीर सभा झाली होती या सभेत ताईंचं भाषण उद्धव ठाकरे लक्ष देऊन ऐकत होते एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी वरपलेल्या क्लुप्त्या लक्षात घेतल्या .विधानसभेच्या निवडणुकीत ताईचा पराभव झाल्यानंतर ही शिवसेना पक्षातर्फे त्यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे या संदर्भात दैनिक सामना मधून त्यांच्या राज्य प्रवक्त्या पदाची निवड जाहीर करण्यात आले आहे शिवसेनेत पहिल्यांदाच महत्त्वपूर्ण पद मिळाल्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या ही प्रतिक्रिया पक्षाने माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे पक्षाची भूमिका आणि जनतेचा आवाज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी म्हटले