शासकीय वार्ताशेती वार्तासमाजीक वार्ता

मासेमारी ठेक्यासाठी आमंत्रणा  …

शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहिर केले आहे. त्यानुसार सन 2025-26 वर्षाकरिता, बुलढाणा जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील 26 तलाव निर्धारित कार्यक्षेत्रातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय, अटी व शर्तीचे अधिन जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीचे मान्यतेने तलाव मासेमारी ठेक्याने देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील 26 तलाव पळसखेड भट 30 हेक्टर, मातला 27 हे., कव्हळ 41 हे., चांदई/गोद्री 35 हे., ब्राम्हणवाडा 96 हे., हराळखेड 42 हे., चायगांव 23 हे., पळशी बोरी 57 हे., कळपविहीर 33 हे., पिंपळगांव चिलमखाँ 28 हे., शिवणी आरमाळ 85 हे., तांदूळवाडी 35 हे., निमगांव वायाळ 10 हे., चोरपांग्रा 36 हे., धामणगांव बढे 35 हे., गणेशपूर 22 हे., हिवरखेड क्र. 120 हे., लांजुड 36 हे., पिंपरखेड 29 हे., कंडारी 40 हे., पलढग 119 हे., नेतन्सा 119 हे., बोराखेडी 144 हे., ढोरपगांव 105 हे., निम्नज्ञानगंगा-II 171 हे., दुर्गबोरी 14 हेक्टर या तलावांची मुदत दि. 30 जून 2025 रोजी संपुष्टात येत आहे. सन 2025-26 वर्षाचे तलाव ठेका प्रक्रियाकरिता नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णय अटी व शर्तीचे अधिन जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीचे मान्यतेने तलाव मासेमारी ठेक्याने देण्याचे प्रस्तावित आहे.

शासन निर्णय कृषी व पदुम विभाग दि. 3 जुलै 2019 मधील तरतूदी व अटी शर्तीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाचे तलाव ठेका मुदत संपुष्टात आलेले तलाव नव्याने मासेमारी ठेक्याने देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर तपशील शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलढाणा कार्यालयाचे नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), बुलढाणा कार्यालयामार्फत देण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button