राजकीय वार्तासमाजीक वार्ता
दलबदलूंना बोलण्याचा अधिकार नाही …आमदार सिद्धार्थ खरात

येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष दिसणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा नेते माजीमंत्री नारायण राणे यांनी केले आहे त्यांच्या वक्तव्याला शिवसेना उबाटा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रतिउत्तर दिलय .. ज्यांना राजकीय नैतिकता नाही, जे दलबदलू आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही.. नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर ते काँग्रेस मध्ये गेले, त्यानंतर भाजप मध्ये गेले त्यांचा मुलगा शिवसेनेत गेला.. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही…त्यांच्या वक्तव्याला कोणी गंभीरतेने घेत नाही असं सांगून त्यांनी भाजपा नेते नारायण राणे यांना प्रतिउत्तर दिलंय …