शेती वार्तासमाजीक वार्ता
बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसात 166 गावांमध्ये 4 हजार 182 हेक्टरवरील पिकांचे नुकसान…मोताळा, नांदुरा, खामगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक नुकसान

बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी मोताळा, नांदुरा, खामगाव आणि जळगाव जामोद या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.. मका, ज्वारी, गहू, भुईमुंग, कांदा या पिकांसह संत्रा, केळी, पपई, लिंबू या फळ फिकांचही नुकसान झालं आहे.. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.. या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे…