आदिवासी सुशिक्षित उमेदवारांना मिळणार विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

आदिवासी उमेदवारांकरीता परतवाडा (जि. अमरावती) येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राकडून विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेची विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी दि. 27 मार्च 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कालावधी दि. 1 एप्रिल ते 15 जुलै 2025 पर्यंत असा साडेतीन महिन्यांचा असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येतो.
*प्रशिक्षणासाठी पात्रता :* उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. किमान वय 18 ते ३० चे दरम्यान असावे, उमेदवार किमान एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण असावा, रोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नोंदणी केलेली असावा.
*आवश्यक कागदपत्र :* शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारीयांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एस.एस.सी. उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नोंदणी प्रमाणपत्र व उमेदवाराचा पासपोर्ट फोटो.
अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी अर्ज आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर कॅम्प, परतवाडा. ता अचलपूर. जि.अमरावती या ठिकाणी उमेदवार निवडीसाठी 28 मार्च रोजी 12 वाजता मुलाखत होणार आहे. यासाठी मुलाखतीस मुळ कागदपत्रासह उमेदवारांनी उपस्थित राहावे. तसेच निवड यादी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहितीसाठी 07223-221205 किंवा 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधावा.