महाराष्ट्रशासकीय वार्ता
लवाद नामतालिका तयार करण्यासाठी इच्छूक व्यक्तींकडून मागविले अर्ज …! पहा काय आहे निकश …..!!
- बुलढाणा, दि.12 ( बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियमातील कलमानुसार सन २०२५ से २०२८ या कालावधीसाठी लवाद नामतालिका तयार करण्यासाठी इच्छूक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले असून पात्र व्यक्तींनी१६ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती यांनी केले आहे.पात्र व्यक्तींमध्ये सर्व न्यायालयातील निवृत्त व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग अॅडव्होकेटस, चार्टर्ड अकाऊन्टंट, कास्ट अकाऊन्टंट, राष्ट्रीय बँका, ग्रामिण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी, सहकार विभागातील उपनिबंधक दर्जापेक्षा वरच्या दर्जाचे सेवानिवृत्त अधिकारी अर्ज सादर करु शकणार आहेत. तसेच अशा व्यक्तींची नियुक्ती करतांना उक्त अधिनियमामध्ये नमुद नसलेले तरी खालील प्रमाणे जादा अर्हता किंवा पात्रता असाव्यात. त्यांचेवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावे. शासकीय किंवा बँक सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. अशी व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीत मध्ये समाविष्ठ नसावा. सदर व्यक्ती संबंधित विभागाच्या विभागीय सहकारी सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. सदर व्यक्ती एकावेळी एकाच विभागातून अर्ज दाखल करु शकते.अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती कार्यालयाचा पत्ता- सहकार संकुल कांता नगर, जुना बायपास रोड, महसुल भवन कार्यालय समोर, अमरावती यांचे कार्यालयात दिनांक 17 डिसेंबर 2024 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दि. 16 जानेवारी 2025 पर्यंत राहिल तसेच प्राप्त अर्जाची छाननी पूर्ण करुन दि 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रारुप लवाद नामतालीका प्रसिध्द होईल. सदर प्रारुप नामतालिका यादी संबंधित विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, अमरावती या कार्यालयात लावण्यात येईल. प्रारुप नामतालिकेवर हरकती असल्यास vaidhanik8@gmail.com या ई-मेल वर पुराव्यासह हरकती दि 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर कराव्यात. हरकतीचा निर्णय दि.11 मार्च 2025 रोजी करुन दि. 18 मार्च 2025 रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिध्द करण्यात येईल. या बाबतची जाहीर सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे आवाहन विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार , सहकारी संस्था, अमरावती यांनी केले आहे.