केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नाला यश..! समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा मार्ग झाला सुकर …!!
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या बदलीचा मार्ग सुकर झाला असून या संदर्भाततील शासन निर्णय आज निर्गमित झाला आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे …
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होत नव्हती . या अभियानांतर्गत नोकरीला लागल्यानंतर एकाच पदावर एकाच ठिकाणी कर्मचाऱ्यांना काम करावे लागत होते या विभागांतर्गत काम करत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदली संदर्भातील विनंती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती या अधिकाऱ्यांच्या बदली विनंती संदर्भात पाठपुरावा करण्यात आला होता या पाठपुराव्याला यश आले असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत एक वेळ विशेष बाब म्हणून बदली करण्यास राज्य शासनाने मंजुरात दिली आहे या संदर्भातील शासन निर्णय 10 डिसेंबर 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा मार्ग सुकर झाला आहे …