बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज बुलडाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीवर आक्रोश न्याय मोर्चा काढण्यात आला
बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समुदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज बुलडाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा कचेरीवर आक्रोश न्याय मोर्चा काढण्यात आला
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. दररोज बलात्कार, खून, लुटमार, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू आहेत म्हणून हा अत्याचार होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असून या घटनेचा निषेध नोंदणीसाठी आज 10 डिसेंबरला बुलढाणा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
स्थानिक गर्दी वाचनालय येथून हा मोर्चा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करत हा मोर्चा जिल्हा कचेरीवर जाऊन धडकला या मोर्चातील एका शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले या मोर्चामध्ये हिंदू समाजातील युवक महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते