शासकीय वार्ता
शेलसूर येथे श्री शिवाजी विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
बुलडाणा, दि. 3 (जिमाका):* भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र, बुलडाणा मेरा युवा भारत व श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत श्री शिवाजी विद्यालयाच्या परिसरात 28 नोव्हेंबर रोजी वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी संग्राम देखमुख, विवेक पवार, प्राचार्य डी.एम. कापसे, एस.एम. केसकर, व्ही.आर. घ्याळ, पी जी. खरात, आर.वाय. जाधव, जे.पी. सोनाळकर उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आईच्या सन्मानार्थ प्रत्येकी एक झाड दत्तक घेऊन त्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.