महाराष्ट्रशासकीय वार्ताशेती वार्तासमाजीक वार्ता

आता फुकटात मिळणार शेतीचे कागदपत्र … या प्रणालीचा करा वापर … 

शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आता फुकटच शेती उपयोगी कागदपत्र मिळणार आहे तुम्हाला तहसिलमधून महसुली दस्तऐवज मिळवण्यात अडचणी येतात का ? मग, आता जिल्हा महसूल प्रशासनाच्या ‘सहज प्रणाली’चा वापर करा आणि दस्तऐवज मिळवा एका क्लिकवर !
पहा तेही निःशुल्क…..

*जिल्हा महसूल प्रशासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम*

*कोणते दस्तऐवज मिळणार ?*
१) सातबारा, ८ अ
२) भुसंपादन निवाडा प्रत
३) पेरे पत्रक
४) फाळणी पत्रक
५) इनाम पत्रक
६) अकृषक आदेश
७) हक्क नोंदणी पत्रक
८) जन्म-मृत्यू नोंद प्रमाणपत्र
९) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
१०) लवाद आदेश
११) नझुल प्रकरणे
इत्याची प्रत या सहज प्रणालीवर पहा मोफत

*शासकीय संकेतस्थळ 👇*
sahajpranali.safevaults.in/login/public

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना वरील लिंकवर अथवा जिल्हा संकेतस्थळावर जाऊन आपल्याशी संबंधित महसुली अभिलेख निःशुल्क पाहता येणार आहेत…आपला मोबाईल नंबर टाका व OTP च्या आधारे लॉगिन करा….

*प्रमाणित प्रत कुठे मिळेल ?*
सहज प्रणालीवरील दस्तऐवजाची प्रमाणित प्रत ऑनलाइन शुल्क भरुन जिल्हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख कक्ष व तहसिलदार कार्यालयातील अभिलेख कक्षातून मिळवता येणार आहे शेतकरी बांधव व नागरिकांनी या सहज प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button