महात्मा फुलेंची जयंती होणार डीजे मुक्त …! उत्सव समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय ..!!
आवाज वाढव डीजे तुला आईची शपत आहे ... डीजेला शपथ पाळण्याची वेळच येणार नाही ....

महामानवांनी केलेल्या कार्यला उजळा देऊन पुढील पिढीला प्रेरणा मिळाण्याच्यादृष्टीकोणा नातुन जयंती उत्सव साजरे केले जातात . पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात.. जयंती उत्सवात डिजेचा वापर मोठ्या प्रमाणत वाढला आहे मात्र बुलडाणा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती डीजे मुक्त करण्याचा निर्णय उत्सव समितीने घेतला आहे त्यामुळे आवाज वाढव डिजे तुला …. आईचा शपथ आहे … आणि डिजेला ही शपथ पाळण्याची गरजच राहणार नसल्याचे सुतोवाच समिती प्रमुखांनी पत्रकार परिषदेत केले आहे … बुलढाणा येथे ८ एप्रिल पासून महात्मा फुलें यांच्या जयंती जन्मोत्सव सुरूवात होणार आहे ११ एप्रिल ला सायंकाळी बुलढाणा शहरात भव्य शोभायात्रा होईल. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीने यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन त्या निमित्ताने केले आहे. याबद्दलची माहिती आज, ७ एप्रिलला बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी दिली. यावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते..पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यातून माती आणि पाणी घेऊन निघालेली मशाल यात्रा ८ एप्रिलला बुलढाण्यात पोहोचेल.
९ एप्रिलला मुठ्ठे लेआउट बुलढाणा येथील महात्मा फुले शाळेत महिला जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी सायंकाळी पुरस्कार वितरण समारंभ देखील पार पडणार आहे. १० एप्रिलला महात्मा फुले शाळा येथे सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत भव्य आरोग्य शिबिर पार पडणार आहे. या आरोग्य शिबिरात नामांकित रुग्णालयात विविध आजारांवर काम करण्याचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. ११ एप्रिलला सायंकाळी ५ संगम चौकातून भव्य शोभा यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती लक्ष्मीकांत बगाडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विशाल सुरोशे, सचिव राजेश पवार, कार्याध्यक्ष नीलकंठ यांच्यासह महिला समितीचे अध्यक्ष प्रीती खंडारे, सचिव प्रीती डांगे, दीपक चौधरी, सुरेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते..
.