बुलडाणा जिल्ह्यात सुरु आहे ‘ काय- द्यायचे राज्य …? पोलीस विशेष वार्तापत्रांने केला मोठा खुलासा …! बुलडण्याची वाटचाल बिडच्या दिशेने …!!…संवेदनशिल गृहमंत्र्यांनी बुलडाण्याकडे लक्ष देणे गरजे…!!!

बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने 7 एप्रिलला विशेष पोलीस वार्तापत्र प्रसिद्ध करण्यात आले . यामध्ये त्यांनी सप्ताहात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला . गेल्या हप्त्यामध्ये जुगार , वरली मटका ,विनापरवाना होत असलेली देशी-विदेशी दारूची तस्करी , जिल्ह्यात सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारू अड्डे व इतर अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध कारवाई केल्याची माहिती दिली आहे पोलीस विभागाने जिल्हा पोलीस अधिक्षक श्री पानसरे यांच्या नेतृत्वात अवैध धंदयांच्या विरोधात कारवाईचा सापटा लावल्याचे म्हटले आहे तर उपशिर्षकामध्ये 8 दिवसात 425 केसेस करून 423 आरोपींवर पोलिसांनी कारवाई केल्याचे नमुद केले आहे शिवाय त्यांच्या जवळून 12 लक्ष 13 हजार 784 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे म्हटले आहे . याचाच अर्थ असा की बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या ‘ काय-द्यायचे राज्य सुरू आहे … काय ? जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधधंदांचा सुळसुळाट झाला आहे हे ह्या निमित्याने पोलीस विभाग एक प्रकारे मान्य केले आहे इतर दिवस पोलीस चुब का बसतात ?असा प्रश्र या निमित्याने उपस्थित होतो *चुब बसण्याचा अर्थ .. करण न समजणारे बुलढाणेकर ही इतके ना समज नाही आहेत ..जिल्ह्यात आठ दिवसात दारूबंदीच्या 288 , जुगाराच्या 137 केसेस होत असतील तर पोलिसांचा अवैध धंदे करणाऱ्यांवर वचक राहिला नाही असंच म्हणावं लागेल . रात्रीला अवैध वाळु माफीयांचे साम्राज्य जिल्हयात सुरु आहे हजारे ट्रक , टिप्परच्या माध्यमातुन रात्रभर वाळुची वाहतुक सुरु असते विशेष म्हणजे ट्रकला नंबर प्लेट सुद्धा नसते . सध्या जिल्ह्यात अवैधधंदे करणाऱ्यांची दादागिरी वाढली आहे पोलीस शिपयाचाही खून ही याच घटनाक्रमातुन झाल्याची घटना ताजी असतांना बुलढाण्याची वाटचाल बीडच्या दिशेने तर होत नाही ना अशी शंका सुज्ञ बुलढाणेकरांच्या मनात उपस्थित होऊ लागली आहे . बुलडाणा जिल्हयात वर्षानुवर्ष पोलीस अधिकारी स्थान मांडुन बसले आहे . महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच बुलढाणा जिल्ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे नाही तर बुलडाणाची वाटचाल बीड दिशेने होण्याची शक्यता नाकारता येत नाही …