आरोग्य वार्ता

लोणार येथे अवैध औषधसाठा जप्त … गर्भपात गोळ्याचा समावेश ..

बुलढाणा, दि. 20 (जिमाका) : अन्न व औषध प्रशासनाच्या मार्फत लोणार येथे अवैध औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.
सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील औषध निरीक्षक गजानन प्रल्हाद घिरके यांना लोणार येथे अवैधपणे औषध साठवणूक केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या आधारे औषध निरीक्षक एम.व्ही. गोतमारे, अन्न व औषध प्रशासन, वाशिम यांच्या समवेत दि.19 डिसेंबर 2024 रोजी मौजे लोणार येथे चंदन मेडीकोजचे मागे रुम क्रमांक 1, बस स्टँड जवळ, लोणार येथे तपास चौकशी केली असता सदर जागेत विनापरवाना औषधी साठवणूक केल्याचे आढळून आल्याने, सुशिल पुनमचंद दरोगा हजर व्यक्ती यांच्याकडून नमूना 16 व पंचनामा अंतर्गत एकूण 24.33 लक्ष चा साठा जप्त करण्यात आला आहे. सदर साठयातून औषध नमूना विश्लेषणासाठी घेण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
चंदन मेडीकल स्टोअर्स, लोणार येथे तपासणीस्तव भेट दिली असता त्यांच्याकडे कामोत्तेजक औषधी (Vigrox-100) आढळून आल्याने रुपये 8 हजार 225 रुपये चा साठा नमूना 15 दि. 19 डिसेंबर 2024 रोजी प्रतिबंधीत करण्यात आला आहे. झोपेच्या गोळया, गर्भपाताची औषधे तसेच नशा येणारी औषधे व सर्व ॲलोपॅथीक औषधे त्यांनी कोणत्याही परीस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय ग्राहकांना देवू नयेत, तसेच प्रत्येक औषधाचे औषध विक्री बिल ग्राहकांना देण्यात यावे अशा प्रकारचे उल्लघंन केल्याचे आढळून आल्यास औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. असा इशारा जिल्हयातील सर्व मेडीकलधारकांना देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्हयातील नागरीकांनी कुठलीही ॲलोपॅथीक औषधे विना प्रिस्कीपशन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. स्वत:च्या मनाने औषधे घेतल्याने शरीरावर दुष्परीणाम होतात असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घिरके, अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा यांनी केले आहे. 000000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button