गरजूपर्यंत जलद आणि सुरक्षितपणे योजना पोचविण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहे ….केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ..*
नवभारत निर्मितीच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून केंद्र सरकारच्यावतीने गरजूपर्यंत जलद आणि सुरक्षितपणे योजना पोचविण्याचे काम केल्या जात आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली
दिल्ली येथील निवासस्थानी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आज 20 डिसेबर रोजी मध्यम प्रतिनिधीशी बोलत होते ते पुढे म्हणाले की
पंतप्रधान श्री नरेद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील JAM ट्रिनिटी, UPI आणि DBT या माध्यामातुन गरजुना जलद गतीने लाभ देण्याच काम केद्र सरकारच्यावतीने सुरु आहे JAM ट्रिनिटी: जन धन योजना, आधार आणि मोबाईलच्या समन्वयातून दुर्बल घटकांना सशक्त करणारे यशस्वी पाऊल भारताने उचल आहे आतापर्यंत 54.19 कोटी बँक खाती उघडली गेली असून ₹2.4 लाख कोटींची ठेव झाली आहे.
UPI: डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक क्रांती झाली आहे फक्त नोव्हेंबर 2024 मध्येच ₹21.55 लाख कोटींचे व्यवहार झाले आहे
DBT: च्या माध्यमातून भेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे आतापर्यंत 40.81 लाख कोटी रुपये भेट लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये पाठविण्यात आले असून 3.5 लाख कोटींची बचत झाली आहे. अशी माहिती आहे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली