जिल्ह्यात ‘प्रशासन गाँव की ओर’ मोहीमेला सुरुवात; कोथळी व खराबडी येथील अपंग लाभार्थ्यांना दिली सेवा
बुलढाणा, दि. 19: केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहेत. या सप्ताहांतर्गत जिल्ह्यात ‘प्रशासन गाँव की ओर’ मोहीमेला गुरुवार दि. १९ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. मोहिमेंतर्गत मौजे कोथळी व खराबडी येथे अपंग लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शासकीय योजनाच्या लाभाचे प्रस्ताव तयार करुन घेण्यात आले. तसेच यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली.
या ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाँव की ओर’ मोहिमेंतर्गत प्रशासनातील विविध विभागांच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करुन विविध सेवांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारीं, अर्जांचा निपटारा करुन सेवांचा लाभ दिला जाणार आहे.
००००