क्राईमवार्ता

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप व 50,000/- रू दंडाची शिक्षा

मलकापूर: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप व 50000 रू दंड तसेच दंड न भरल्यास 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश दिनांक 09/12/2024 रोजी मलकापुर येथील वि. जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश श्री. एस. व्ही. जाधव साहेब यांनी आरोपीस सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापुर येथे राहणारी अल्पवयीन मुलीला आरोपी किसना यादव सोनोने तसेच अमोल समाधान वानखेडे रा. मलकापुर या दोघांनी त्यांचे घरी बोलावुन पिडीतेवर लैगिक अत्याचार केला. व त्यामधुन ती गर्भवती राहिली. सदर घटनेबाबत पिडीता हिने पोलिस स्टेशन मलकापुर शहर येथे अप. नं 299/2020 नुसार कलम 376(3), (2), (जे), (एन), डीए, 323, 504, 506,34 भा.दं. वि. सहकलम 4, 5 (एल) (जे) (2), 6 बालकांचे लैगिंक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचे गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करून तपासाअंती दोषारोपपत्र वि. विशेष न्यायालय मलकापुर येथे दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणातील आरोपी किसना यादव सोनोने हा प्रकरणाची सुनावणी दरम्यान फरार झाला आहे. आरोपी अमोल समाधान वानखेडे याचा जामिन अर्ज वि.न्यायालयाने फेटाळण्यात आल्यानंतर आरोपी यास न्यायालयीन बंदी ठेवुन सदरचे प्रकरण चालविण्यात आले. आरोपी अमोल समाधान वानखेडे यांचेविरूद्ध सरकार पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी तसेच डी.एन.ए. तज्ञ, व तपास अधिकारी यांचे पुराव्यानंतर आरोपी नं 2 अमोल समाधान वानखेडे याचे विरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने अंतिम सुनावणी होवुन सरकार पक्षातर्फे शैलेश जोशी विशेष सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून आरोपी अमोल समाधान वानखेडे रा. मलकापुर यास अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 6 सहवाचनिय कलम 5 (जे) (ii)आणि 5 (1) नुसार जन्मठेप म्हणजेच उर्वरीत आयुष्य आहे तो पर्यंत तसेच 25,000/- रू दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्त मजुरी तसेच कलम
4(2) पोक्सो कायद्‌यानुसार जन्मठेप व 25,000/- रू दंड, दंड न भरल्यास दोन वर्षे सक्त मजुरी तसेच कलम 323 भा.दं. वि.नुसार 1 वर्षे शिक्षा तसेच कलम 506 भा.दं. वि. नुसार 1 वर्ष शिक्षा आरोपीस सुनावली आहे. आरोपीस वि.न्यायालयाने कलम 323, 506, 376 (2) (एन), 376 (2) (जे), 376(3)भा.दं.वि.तसेच कलम 4(2), 6 सहकलम 5 (जे) (ii), आणि कलम 6 सहवाचनीय कलम 5 (1), बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 या कलमांतर्गत दोषी ठरविण्यात आले. आरोपी अमोल समाधान वानखेडे यांचेकडुन 50,000/- रू वसुल झाल्यानंतर सदर रक्क्म पिडीतेस देण्याचा आदेश वि.न्यायालयाने दिलेला आहे तसेच सामाजिक न्याय विभागा मार्फत देण्यात येणाऱ्या पिडीत नुकसान भरपाई योजनेअंतर्गत सुद्धा जिल्हा विधीसेवा प्राधिकरण बुलढाणा यांना अतिरीक्त नुकसान भरपाई ठखुन पिडीतेस देण्याबाबत सुद्धा आदेश देण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास तपासअधिकारी पोलिस उपनिरीक्षक श्री. गणेश शिंदे यांनी केला होता. तसेच पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस उपनिरीक्षक श्री. संतोष भिकाजी कोल्हे पो.स्टे.
मलकापुर शहर यांनी काम पाहिले. पिडीतेतर्फे अॅड. विशाल गोविंदा इंगळे यांनी सरकार पक्षास मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button