क्राईमवार्ता
पाच लाखांच्या गुटख्यासह दहा लाखाचा मुद्देमाल जप्त पोलिसांची केला जप्त .. …
खामगाव शहर पोलीसांची कारवाई

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी केली असता, जयपुर लांडे फाट्यावर नांदुरा कडून येणाऱ्या एका मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला, पोलिसांनी 4 लाख 93 हजाराच्या गुटख्यासह वाहन असा 10 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शिरसगाव येथील वाहन चालक नितीन मधुकर इंगळे याला अटक केली आहे…