राजमाता जिजाऊ चरणी नतमस्तक होऊन गायत्री शिंगणे फोडला प्रचारांचा नारळ .. ! काका विरुद्ध पुतणीचा संघर्ष होण्याची शक्यता. ..!!

राजमाता जिजाऊ चरणी नतमस्तक होऊन गायत्री शिंगणे फोडला प्रचारांचा नारळ .. !
बुलढाणा जिल्ह्याच्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी सिंदखेड राजा मतदारसंघाकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे, या मतदारसंघात डॉ राजेंद्र शिंगणे विरुद्ध त्यांची पुतणी गायत्री शिंगणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यामुळे या मतदारसंघांमध्ये काका पुतणीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे अपक्ष उमेदवार गायत्री शिंगणे यांनी 6 नोव्हेबरल राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन आपल्या प्रचाराचा नारळ बंधू गौरव शिंगणे यांच्या हस्ते फोडला यावेळी त्यांच्यासोबत गायत्री शिंगणे यांच्या मातोश्री गौरी शिंगणे व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिनखेडराजा मतदारसंघ हा विकासापासून दूर राहिलाय या मतदारसंघात विकास करण्याच्या दृष्टिकोनातून परिवर्तन होणे गरजेचे आहे आणि हे परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपली उमेदवारी या मतदारसंघात दाखल केली आहे या मतदारसंघात स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांना मानणारा एक विशेष वर्ग आहे त्या सर्वांचे सहकार्य घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं मी निवडणूक रिंगणात असली तरीही प्रचार करणार नाही पेटी बंद करणार आहे अशा अफवा सध्या मतदारसंघात फैलवल्या जात आहे असे अफवांवर मतदारांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन गायत्री शिंगणे यांनी केले गायत्री शिंगणे यांच्या उमेदवारीमुळे डॉ राजेंद्र शिंगणे यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे ..