साहेब आले पण मी बोलली नाही …गायत्री शिंगणे निवडणूक लढविण्यावर ठाम .. !
सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज
बुलडाणा – सिंदखेडराजा
मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी मी आपल्या भूमिकेवर ठाम आहे अशी प्रतिक्रिया गायत्री शिंगणे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली ..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी फुटीनंतर अजितदादा यांच्या सोबत गेले होते त्यानंतर गायत्री शिंगणे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सिदखेडराजा मतदारसंघात काम सुरु केले होते पक्षाचे तुतारी चिन्ह हे घराघरापर्यंत पोचवले गायत्री शिंगणे यांनी गेल्या वर्षभरापासून विधानसभेची तयारी सुरू केली होती मतदार संघातील लोकांची सहानुभूती गायत्री सोबत निर्माण होत असतांनाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार त्यांची भेट घेतली आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केला सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली त 25 ऑक्टोंबरला खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला नामांकन अर्ज ही दाखल केला यावेळी झालेल्या जाहीर सभेमध्ये अमोल कोल्हे यांनी गद्दार आणि खोकेबाज असा उल्लेख आपल्या भाषणांमध्ये केला याचाच धागा पकडून गायत्री शिंगणे यांनी कसले निष्ठावंत असा प्रश्न उपस्थित करून आता गद्दार आणि निष्ठावंत म्हणण्याचा अधिकार त्यांना नाही असा टोल शरद पवार राष्ट्रवादी गटाला मारून सोमवारी आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले .
साहेब आले पण मी ठाम …
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी साहेब आपली समजूत काढण्यासाठी घरी आले होते परंतु आपले व त्यांचे कोणतेही संभाषण झाले नाही मी निघून गेले मी माझ्या भूविकेवर ठाम असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा पुनर्विचार गायत्री शिंगणे यांनी केला त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिंगणे विरुद्ध शिंगणे अशी लढत या मतदारसंघात होणार आहे